संत रोहिदास महाराज उन्नती मंडळ कळसुलीने शिवजयंती केली उत्साहात साजरी

कणकवली: कणकवली तालुक्यातील कळसुली येथे संत रोहिदास महाराज उन्नती मंडळ कळसुली यांच्या विद्यमाने महाराष्ट्र चे आराध्य दैवत श्रीमंत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल सदाशिव चव्हाण आणि उपाध्यक्ष अजित शंकर चव्हाण यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत केले.

महाराजांच्या मूर्ती समोर दिपप्रज्वलन करण्यात आले तसेच मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला.कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार प्रदर्शन सचिव श्री कृष्णा लक्ष्मण चव्हाण यांनी केलं. कार्यक्रमाला उपस्थिती शिवप्रेमींनी महाराजांची धोरवी त्यांची राजनीती,बालपण, पराक्रम मोठ्या उत्साहाने सांगितले.

पहा व्हिडिओ:

https://x.com/sk_1810chavan/status/1892186456065814594?t=QcOrBxxwIv9koCb6e7ezjA&s=19 po

यावेळी शिवरायांच्या जयंती निमित्ताने उपस्थित शिवप्रेमींना कै.शंकर आबा चव्हाण यांच्या स्मरणार्थ अजित शंकर चव्हाण यांच्या कडून भोजन देण्यात आले.तसेच वाडीतील सर्व ज्येष्ठांचा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला, वाडीतील सर्व महिलांनी हळदीकुंकू आणि फनी गेम्स मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल चव्हाण,उपाध्यक्ष अजित चव्हाण,सचिव कृष्णा चव्हाण,सहसचिव किशोर चव्हाण,खजिनदार निकेत चव्हाण,संचालक पुंडलिक चव्हाण,संचालक प्रभाकर चव्हाण,संचालक मनोहर चव्हाण,संचालक हरेश चव्हाण,संचालक प्रकाश चव्हाण आणि संचालक अक्षय चव्हाण,संचालक पांडुरंग चव्हाण तसेच सदर कार्यक्रमांमध्ये संत रोहिदास उन्नती मंडळ कळसुली चे सर्व संचालक तसेच सल्लागार आणि श्री संत रोहिदास महाराज स्वयं सहायता महिला मंडळ यांचं मोलाचं योगदान लाभले.

error: Content is protected !!