अजित पवार राष्ट्रवादीचा सिंधुदुर्गातील बडा नेता शिवसेनेच्या गळाला

कुडाळ : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे एक बडे नेते म्हणून ओळख असणारे हेमंत उर्फ काका कुडाळकर यांनी आज शिवधनुष्य हाती घेतले.

काका कुडाळकर हे माजी मुख्यमंत्री तथा खा. नारायण राणे यांच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले आहे. शासन आणि प्रशासनाला हाताळण्याचा गाढा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्याचप्रमाणे त्यांना मानणारे असंख्य कार्यकर्ते या जिल्ह्यात आहेत. त्यांच्या आजच्या या प्रवेशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची निश्चितच ताकद वाढणार आहे.

error: Content is protected !!