आज दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM) आणि पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग (भरोसा सेल) यांच्या संयुक्त विद्यमाने ““समाजासाठी पोलिसांची भूमिका”” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.हा कार्यक्रम शहीद पोलीस दिन (२१ ऑक्टोबर) या निमित्ताने समाजासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती वंदना करून करण्यात आली. सरस्वती वंदनेचे सादरीकरण पोलीस हवालदार श्री. मेस्त्री यांनी स्वतः सादर करून कार्यक्रमाला एक वेगळी शोभा आणली.
या कार्यक्रमात उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. नलिनी शिंदे, तसेच पोलीस हवालदार श्री. मेस्त्री आणि लेडी पोलीस कॉन्स्टेबल सौ. साक्षी खोपकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
या व्याख्यानाचे उद्दिष्ट म्हणजे समाजासाठी पोलिसांची निष्ठा, सेवा आणि जबाबदारी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे होते.
व्याख्यानादरम्यान अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले —
• अपघात झाल्यास फोटो काढत न बसता जखमी व्यक्तीला मदत करावी,
• वस्तीत संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ १०० किंवा ११२ वर संपर्क साधावा,
• पोलिसांकडे भयाने नव्हे, तर मित्रभावाने पाहावे,
• तसेच पोलिस दलात वापरल्या जाणाऱ्या रायफल, रिव्हॉल्व्हर यांसारख्या उपकरणांची माहिती देण्यात आली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. नलिनी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश दिला आणि स्पर्धा परीक्षांद्वारे पोलिस दलात सामील होण्याचे प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढनाल यांनी सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले.
या प्रसंगी प्रा. विशाल कुशे (प्राचार्य – डिप्लोमा विभाग),प्रशासकीय अधिकारी श्री. राकेश पाल,कार्यक्रम समन्वयक प्रा. रामचंद्र सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मृणाली कुडतरकर यांनी प्रभावीपणे केले.
कार्यक्रमाच्या शेवटी या वर्षी शहीद झालेल्या पोलिसांना दोन मिनिटे स्तब्ध राहून आदरांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष पाल ,उपाध्यक्ष श्री. विनोद कदम, सचिव नेहा पाल, खजिनदार वृषाली कदम आणि डायरेक्टर केतन कदम यांनी शुभेच्छा दिल्या.
















 
	

 Subscribe
Subscribe









