Phulpakhru Song: चिमुकल्या परीच्या निरागस दुनियेची सुंदर सफर घडवणारं ‘फुलपाखरू’ गाणं प्रदर्शित

अभिनेत्री मनिषा इंगळे, अभिनेता सनी कांबळे आणि बालकलाकार रिधिमा निचित यांचं ‘फुलपाखरू’ हे नवं मराठी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. टाइमलेस स्लेट्स प्रस्तुत या गाण्यात बालपणातील निरागसता, कल्पनाविश्व आणि कुटुंबातील प्रेमळ क्षण अनुभवायला मिळतात. गाण्याची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन सनी कांबळे यांनी केलं आहे.








