परप्रांतीयांचा स्थानिक भूमिपुत्रांच्या नोकरी–शिक्षणातील सीटवर डल्ला!

हा घोटाळा उघडकीस आल्याबद्दल राजेंद्र कोंढरे यांचे मनःपूर्वक आभार..!

अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष मा. राजेंद्र कोंढरे साहेबांची पोस्ट पाहीली राजस्थानी परप्रांतीय विद्यार्थ्यानी स्थानिकांच्या वैधकिय क्षेत्रातील शैक्षणिक सीटवर डल्ला मारल्याची ती सविस्तर पोस्ट देत आहे. पण प्रश्न हा की हे फक्त वैधकिय शैक्षणिक सीटवर मध्येच घडत नसावे तर इतर नोकरी व शिक्षणातील सीटवर बाबत ही घडत असावे ही दाट शंका आहे. कारण शासकीय विविध अस्थापना मध्ये परप्रांतीय अधिकारी- कर्मचारी संख्या कमालीची दिसू लागली आहे.

नाॅन क्रिमेलिअर (NCL) प्रमाणपत्र हे फक्त “राज्याच्या मागासवर्ग आयोगाच्या यादीत समाविष्ट असलेल्या जातींनाच” दिले जाते.
महाराष्ट्रातील OBC / VJNT / SBC / SEBC (Maratha) या प्रवर्गातील जातींची यादी ही फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांसाठीच लागू असते.

👉 त्यामुळे परप्रांतीय नागरिकास — म्हणजेच महाराष्ट्राबाहेरील राज्याचा रहिवासी असलेल्या व्यक्तीस — महाराष्ट्र शासनाकडून NCL प्रमाणपत्र मिळत नाही.

पण जर असे परप्रांतीय लोक गैरमार्गाने जात प्रमाणपत्र आणि NCL मिळवून महाराष्ट्रातील आरक्षणातील नोकरी व शिक्षणातील जागांवर डल्ला मारत असतील,
तर हा प्रकार अत्यंत गंभीर असून स्थानिक भूमिपुत्रांच्या अधिकारांवर अन्याय करणारा आहे.

📢 शासनाने अशा प्रकारांवर कडक तपासणी, पडताळणी व कारवाई करण्याची गरज आहे,
जेणेकरून महाराष्ट्रातील खऱ्या पात्र विद्यार्थ्यांना आणि उमेदवारांना न्याय मिळेल.

https://www.facebook.com/share/p/17eo8UZKT5

error: Content is protected !!