मृतदेह ताब्यात घेण्यास आजही नकार

बांदा आत्महत्या प्रकरणात वातावरण तंग

बांदा : आफताब शेख आत्महत्या प्रकरणात आजही मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. या प्रकरणातील पाचही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीवर मृत आफताबचा भाऊ अब्दुल रझाक शेख ठाम असून, तो आपल्या भूमिकेवर अडिग आहे.

या पार्श्वभूमीवर बांदा शहरात वातावरण तंग झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, येत्या दोन दिवसांत संबंधित सर्व संशयितांचे जबाब नोंदविण्यात येणार असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी दिली.

स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेबद्दल संतापाचे वातावरण असून, न्याय मिळावा यासाठी शेख कुटुंबीय ठाम आहेत. पोलीस मात्र परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेत आहेत.

error: Content is protected !!