किरकोळ वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला

सावंतवाडी येथील घटना; तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत

बाटली किंवा खुर्ची मारल्याचा प्राथमिक अंदाज

सावंतवाडी : डोक्यावर प्रहार केल्यामुळे तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना सावंतवाडी शहरात घडली आहे. किरकोळ कारणावरून तरुणांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. या हल्ल्यात तरुणाच्या डोक्यावर बाटली व खुर्चीने जोरदार प्रहार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाला असून हल्ल्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. परंतु, डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे हल्ला झालेला तरुण माहिती देण्याच्या स्थितीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान जखमी तरुणाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अधिक उपचार सुरू आहेत.

error: Content is protected !!