साळीस्ते खून प्रकरणात प्रॉपर्टी वादाचा सुगावा!

श्रीनिवास रेड्डी होते बेंगलोर परिसरातील गर्भश्रीमंत व अविवाहित व्यक्ती

कणकवली : तालुक्यातील साळीस्ते येथे सापडलेला मृतदेह हा श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचे स्पष्ट झाले असून, हा खून ‘प्रॉपर्टी’च्या कारणातून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

श्रीनिवास रेड्डी हे बेंगलोर परिसरातील गर्भश्रीमंत व अविवाहित होते. त्यांची तेथे मोठी मालमत्ता असून, त्याचाच वाद या खुनामागे असल्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तविली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी कणकवली पोलिसांचे पथक बेंगलोर येथे रवाना झाले आहे.

दरम्यान, श्रीनिवास रेड्डी यांच्या पश्चात त्यांची आई असून ती देखील डॉक्टर आहे. त्या पुढील दोन दिवसांत कणकवलीत येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

error: Content is protected !!