आ.निलेश राणे यांनी मानले महाराष्ट्र सरकारचे आभार
मालवण: मालवण किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य स्वरूपातील तलवारधारी पूर्णाकृती पुतळा उभारणी महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने होत असलेल्या महाराजांचा पुतळा उभारणी कामाचा पायाभरणी सोहळा आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी जेष्ठ आमदार कालिदास कोळंबकर, आ. दीपक केसरकर, आ. निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, बांधकाम विभाग अभियंता महेंद्र किणी, मुख्यकार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांसह शिवप्रेमी उपस्थित होते.

यावेळी आ.निलेश राणे यांनी बोलताना रयतेचा राजा अशी ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. यानिमित्ताने या राजाचे स्मरण करण्याची संधी आपल्याला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गडकोट किल्ले आजही आपल्याला त्यांनी दाखवलेल्या शौर्याची प्रचिती देत आहेत. आज राजकोट किल्ला येथे पुतळा उभारणीसाठी महाराष्ट्र सरकारकडून ३१ कोटी ७५ लाख इतका निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल आभार व्यक्त केले.













