कुडाळ तालुक्यातील पाट येथील घटना
कुडाळ : परप्रांतीय व्यक्तीकडून स्थानिक तरुणाचा पाठलाग केल्याची घटना कुडाळ तालुक्यातील पाट येथे घडली. याबाबत निवती पोलिस स्थानकात परप्रांतीय व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुडाळ तालुक्यातील तुळसुली गावातील तरुण आपल्या पत्नीसमवेत भाऊबीजेसाठी परुळे येथे जात असता एक गाडी त्यांचा पाठलाग करत असल्याचा संशय त्यांना आला. याबाबत संबंधित पाठलाग करणाऱ्या व्यक्तीला पाट येथे थांबवून विचारणा केली असता त्या व्यक्तीने उडवाउडीची उत्तरे देत शिवीगाळ केली. यावेळी पीडित तरुणाने ११२ नंबरवर पोलिसांना कॉल करून ही बाब पोलिसांच्या कानावर घातली. यावेळी पोलिसांनी तक्रारदार तरुण व संबंधित परप्रांतीय व्यक्तीला निवती पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जात तक्रार दाखल केली.
याबाबत पिडित तरुणाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून एक गाडी वारंवार त्यांच्या मागावर होती. घरातून बाहेर पडताच त्यांचा पाठलाग सुरू व्हायचा. पाट येथे घडलेल्या घटनेनंतर परप्रांतीय व्यक्तीने हद्दच पार केली. या परप्रांतीय व्यक्तीने थेट तुळसुली गाव गाठत एका प्रतिष्ठित व्यक्तीकडे पीडित तरुणाबाबत चौकशी केली. तसेच या तरुणाला उचलून थेट गाडीत टाकणार असे सांगितले. या घटनेनंतर पीडित तरुण प्रचंड दहशतीखाली जगत आहे. तसेच आपल्या जीविताला धोका असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रातील एक शांत व सुसंस्कृत जिल्हा अशी सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे. गेल्या काही वर्षांपासून परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे सिंधुदुर्गात येत आहे. कणकवली तालुक्यातील साळीस्ते येथे घडलेली घटना आणि आताची घटना पाहता ही बाब फार गंभीर असून याकडे याकडे लक्ष न दिल्यास भविष्यात गंगीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे एवढं नक्की!


Subscribe










