अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे नेण्याचा डॉक्टरांचा सल्ला
सावंतवाडी : किरकोळ वादातून झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सालईवाडा (सावंतवाडी) येथील ललित परब या तरुणाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्याच्यावर ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याला दोन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या आहेत. डॉक्टरांनी त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी किंवा ओरोस येथे हलविण्याचा सल्ला दिला होता.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’ या संस्थेच्या माध्यमातून ललित परब याला तातडीने ओरोस रुग्णालयात नेण्याची जबाबदारी घेतली आहे. जखमी ललित परब याचे नातेवाईक किंवा परिचित कोणी असतील तर त्यांनी तत्काळ सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव (संपर्क क्रमांक: 9405264027) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.