कधी आहे भाऊबिजेचा मुहूर्त?
ब्युरो न्यूज: भाऊबीज बहीण भावाच्या अतूट नात्याचा जिव्हाळ्याचा सण.या दिवशी भाऊ बहीण आपल्या अतूट नात्याला अजून घट्ट करण्यासाठी जणू प्रेमाची बीजे पेरून वर्षभर या नात्याला नवीन बहर देतात.
यावर्षी भाऊबीज नेमकी कधी करावी याबद्दल संभ्रम आहे. त्यामुळे भाऊबीज नेमकी कधी आणि कुठल्या वेळी करावी याबाबत जाणून घेऊयात.
हिंदू पंचांगानुसार यंदा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया या तिथीला २नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ८वाजून २२ मिनिटांनी सुरुवात होते, आणि या तिथीची समाप्ती ३ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ११वाजून ६ मिनिटांनी होते. त्यामुळे उद्याच म्हणजे तीन तारखेला सर्वत्र भाऊबीज हा सण साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाचं औक्षण करते आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते.
पुजेसाठी शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार उद्या सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ३० मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे. या काळात तुम्ही तुमच्या भावाचं औक्षण करू शकता. त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करू शकता. पौराणिक मान्यतानुसार या दिवशी शुभ मुहूर्तावर जर बहिणीने भावासाठी प्रार्थना केली तर भावाला दीर्घ आयुष्य प्राप्त होते. तसेच त्याच्या घरी सुख समृद्धी येते.