मृदूंग हुस्ताद डॉक्टर श्री दादा परब यांनी जर्मन देशात फडकवला वाद्य कौशल्याचा झेंडा

शब्दांकन=श्री राजा सामंत नेरूर

जगविख्यात गायक स्वराधीश डॉक्टर पंडित भरतकुमार बलवल्ली यांच्या जर्मनी येथे संपन्न झालेल्या गायनाच्या मैफिलीत ऑर्गनसम्राट पंडित मकरंद कुंडले, तबला हुस्ताद रामकृष्ण करंबळेकर यांच्या बरोबरीने मृदूंगावरती समर्पक साथसंगत करून सिंधुदुर्गाचे प्रसिद्ध मृदूंग हुस्ताद दादा परब यांनी जर्मनी येथील संगीत रसिक मनावर गारुड करून सिंधुदुर्गाच्या वैभवशाली परंपरेत शिरपेज खोवला आहे. डॉक्टर दादा परब यांच्या या दैदीप्यमान यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
जर्मनी फॅन्क फर्ट या शहरात हिंदू आद्य संस्कृतीचे उपासक आणि थोर विठ्ठल भक्त प. पु. शिवानंद महाराज यांनी बांधलेल्या विठ्ठल मंदिरच्या म्युझिअम मधील आलिशान रंगमंच्यावर या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.

डॉक्टर श्री. दादा परब यांनी कुडाळ तालुक्यातील भोईचे केरवडे सारख्या ग्रामीण गावातून आपल्या संगीतमय कारकिर्दीची सुरुवात केली. सुरुवातीच्या कालखंडत त्यांना साळगाव येथील तुळशीराम गावडे यांच्यासारख्या तबला क्षेत्रातील गाढ्या अभ्यासकाच मार्गदर्शन लाभलं. त्यानंतर त्यांनी तबला क्षेत्रातील सखोल अभ्यासक असणाऱ्या गुरुवर्य प्रमोद मुंडये यांसारख्या गुरुतुल्य व्यक्तीच मार्गदर्शन घेतलं.ह. भ. प. प्रशांत धोंड सर यांच्यामुळे त्यांना गोवा येथील प्रसिद्ध तबला पखावाज हुस्ताद कै. पंडित मारुतीबुवा खुर्डीकर यांच्यासारखा इंटरनॅशनल दर्जाचा गुरु लाभला. गुरुवर्य खुर्डीकर बुवांच्या मार्गदर्शनामुळे अल्पकालावधीतच डॉक्टर दादा परब यांनी तबला पखावाज क्षेत्रात अति आवश्यक असलेले शास्त्रयुक्त साथ संगतीचे कौशल्य अवगत केले.त्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी मुंबई इथल्या अनेक दिग्गज भजनी बुवांना तसेच राष्ट्रीय कीर्तनकारांना साथसंगत करण्याचे त्यांना भाग्य प्राप्त झाले. मृदूंग क्षेत्रात गजानन देसाई आणि भजन क्षेत्रात भजनसम्राट श्री कृष्णा पवार यांना ते आपले दीपस्तंभ मानतात. आपल्या यशात भजनसम्राट भालचंद्र केळूसकर,भजनसम्राट गोपीनाथ बुवा बागवे, भजनासम्राट कै. विलासबुवा पाटील,बुवा श्री सतीश राणे, बुवा श्री प्रकाश चिले, बुवा श्री हरिहर नातू,नादब्रम्ह ग्रुप सावंतवाडी तसेच सुप्रसिद्ध गायक ऍड.दिलीप ठाकूर, तबला हुस्ताद हेमंत प्रभू यांचा फार मोठा वाटा असल्याच डॉक्टर दादा परब आवर्जून सांगतात. सध्या ते मुंबई डोंबिवली येथे स्थायिक असून मृदूंग वाद्याचे सखोल अभ्यासक गुरुवर्य पंडित ज्ञानेश्वर डिंगोरकर यांच त्यांना मार्गदर्शन लाभत आहे.सिंधुदुर्ग, रत्नागिरी सहीत मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव, गोवा, कर्नाटक,कारवार,धारवळ अशा मोठ्या राज्यात दादा परब यांनी तबला पखवाज सोलो तसेच अनेक लौकिकप्राप्त गायक कलाकारांच्या मैफिलीला अनेकवेळा साथसंगत करून संगीत रसिकांची वाहवाह मिळवली आहे. कर्नाटक सदाशिवगड येथील महामाया देवीच्या मंदिरातील आलिशान रंगामंच्यावर पंडित मारुतीबुवा खुर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या संगीत संमेलनात दादा परब यांचं मृदूंगावरील शास्त्रयुक्त सादरीकरण पाहून जगविख्यात गायक स्वराधीश डॉक्टर पंडित भरतकुमार बलवल्ली व त्यांचे वडील पंडित तारानाथ यांचे शिष्य तबला हुस्ताद पंडित मोहन बलवल्ली हे कमालीचे भारावून गेले. व त्यांनी डॉक्टर दादा परब यांना मुंबई गिरगांव येथील साहित्यसंघ सभागृहात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शुरा मी वंदिले या मैफिलीत तबला हुस्ताद पंडित साई बँकर यांच्या बरोबरीने मृदूंगाववरती साथसंगत करण्याची संधी प्राप्त करून दिली. त्या मैफिलीत जगविख्यात गायक स्वराधीश डॉक्टर पंडित भरतकुमार बलवल्ली यांच्या बरोबरीने जगविख्यात गायिका अर्चना कानेरे यांच्या पल्लेदार गायकीला  दादा परब यांनी ऑर्गनवादक पंडित विश्वनाथ कानेरे व तबला हुस्ताद पंडित साई बँकर यांच्या बरोबरीने केलेली शास्त्रयुक्त मृदूंगावरची साथसंगत मैफिलीत अनोखी रंगत भरून गेली. दादा परब यांच्या कारकिर्दीतील ती मैफिल उत्कर्षाचा टर्निंग पॉईंट ठरली.गेली चौवीस वर्ष ते अविरतपणे भारत देशातील प्रमुख शहरांमध्ये जगविख्यात गायक स्वराधीश डॉक्टर भरतकुमार बलवल्ली यांच्या मैफिलीत  मृदूंगावरती अविरत साथसंगत करत आहेत. म्हणूनच ते अभिमानाने सांगतात की आपल्या यशात स्वराधीश भरतकुमार बलवल्ली यांचा फारमोठा वाटा आहे.आतापर्यंत दादा परब यांनी पंडित शौनक अभिषेकी,पंडित सुरेश वाडकर,पंडित जयतीर्थ मेवंडी, पंडित रघुनंदन फणशिकर, पंडित आनंद भाटे, विदुशी आरती अंकलेकर टिकेकर, विदुशी मंजुषा पाटील, विदुशी निलाक्षी पेंढारकर, सुप्रसिद्ध पार्शगायिका अनुराधा पौडवाल, विदुशी देवकी पंडित, सारेगमप फेम सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर व मुग्धा वैष्मपायन,सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, विदुशी अश्विनी भिडे देशपांडे, विदुशी आशा खाडिलकर,विदुशी अर्चना कानेरे, सुप्रसिद्ध गायिका सावनी शेंडे,सुप्रसिद्ध गायिका केतकी माटेगावकर, सुप्रसिद्ध गायक उमेश चौधरी,सुप्रसिद्ध गायक पंडित सार मंडळी अशा सर्वच दिग्गज कलाकारांच्या मैफिलीत तबला हुस्ताद साई बँकर,तबला हुस्ताद धनंजय पुराणिक, तबला हुस्ताद रामकृष्ण करंबळेकर, तबला हुस्ताद आनंद बदामीकर, तबला हुस्ताद आदित्य पानवलकर, तबला हुस्ताद सुहास चितळे,तबला हुस्ताद प्रसाद पाध्ये, तबला हुस्ताद इशाद पवार,तबला हुस्ताद कै. जगदीश मयेकर, तबला हुस्ताद कै. अशोक कदम,तबला हुस्ताद दयानंद कांदोळकर,तबला हुस्ताद डॉक्टर मोटे,तबला हुस्ताद दहेश कोशंबे मृदूंगचार्य दिनकर भगत, बासरी वादक धवल जोशी, बासरी वादक अमर ओक, साईड रिदम वरद काटापूरकर, बासरी वादक के.आकाश, हार्मोनियम वादक आदित्य ओक, सिंटेसायझर सारेगमप फेम सत्यजित ओक, साईड रिदम मंदार गोगटे, हार्मोनियम वादक अमित पाध्ये, हार्मोनियम वादक राया कोरगावकर, ऑर्गनसम्राट पंडित विश्वनाथ कानेरे, ऑर्गनसम्राट पंडित मकरंद कुंडले, बासरी वादक धवल जोशी, साईड रिदम सूर्यकांत सुर्वे अशा सर्व दिग्गज हुस्तादी वादक कलाकारांच्या बरोबरीने दादा परब यांनी मृदंग कौशल्य सादर करून रसिक मनावर गारुड करून सिंधुदुर्गाच्या वैभवशाली संगीतमय परंपरेत शिरपेज खोवला आहे. या सर्व दिग्गज जगविख्यात गायक व वादक कलाकारांबरोबर आपल्याला मृदूंग कौशल्य सादर करता आल त्याबद्दल ते स्वतःला भाग्यवंत समजतात. तसेच या सर्व दिग्गज गायक आणि वादक कलाकारांनी आपल्याला वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल व मार्गदर्शनाबद्दल ते वेळोवेळी मनःपूर्वक आभारही मानतात.सूत्रसंचालक भाऊ मराठे, मंगला खाडिलकर, मोहन कानेरे अशा दिग्गज सूत्रसंचालकांच वेळोवेळी आपल्याला सहकार्य प्राप्त झाल्याच दादा परब आवर्जून सांगतात.जगविख्यात तबला हुस्ताद पंडित कै. झाकीर हुसेन व तालवाद्याचे जगविख्यात अभ्यासक पंडित तौफिक खुरेशी यांनीसुद्धा प्रत्यक्ष भेटून दादा परब यांच्या मृदूंग कौशल्यातील नजाकतीची खुल्या दिलाने वाहवाह केली आहे.

जर्मनी मधील मैफिल
जर्मनी येथे फॅन्क फर्ट शहरातील विठ्ठल मंदिरातील म्युझिअम मधील आलिशान रंगमंच्यावर हिंदू धर्माच्या आद्य संस्कृतिचे गाढे अभ्यासक व थोर विठ्ठल भक्त प. पु. शिवानंद महाराज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गायनाच्या मैफिलीची सुरुवात स्वराधीश पंडित भरतकुमार बलवल्ली यांनी हरी जयजय राम कृष्ण हरी या गजराने केली. त्यावेळी जर्मन संस्कृतीतील संगितप्रेमी रसिक रामनामाचा ठेका धरत गाऊ नाचू लागले. संपूर्ण माहोल मन राम रंगी रंगले असाच होऊन गेला होता.त्यानंतर यांनी माझे माहेर पंढरी, या पंढरीचे सुख, हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा असे अनेक भावपूर्ण अभंग आपल्या स्वर्गीय साक्षात्कार घडवणाऱ्या गंधर्व शैलीतील पल्लेदार गायकीने सादर करून स्वराधीश भरतकुमार बलवल्ली यांनी जर्मनी येथे साक्षात पंढरपूर उभे केले. भक्तीरसात चिंब न्हाऊन गेलेले जर्मन संस्कृतीतील संगीतप्रेमी रसिक आपले देहभान विसरून गेले होते. प्रत्येकाची अवस्था दृष्टी न फिरे माघारी विठ्ठला तुज पहाता सामोरी अशीच होऊन गेली होती. ऑर्गन सम्राट पंडित मकरंद कुंडले यांची सप्तसुरांची झनकार, तबला हुस्ताद रामकृष्ण करंबळेकर आणि मृदूंग हुस्ताद डॉक्टर दादा परब यांच्या तबला पखवाजावती  थिरकणाऱ्या बोटांचा ठेका धरत पंडित भरतकुमार बलवल्ली यांनी चक्क पाच तास जर्मन संस्कृतीतील रसिक श्रोत्यांना अक्षरशः एका जाग्यावर खिळवून ठेवले होते. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा या भाव पुर्ण अभंगाला उपस्थित रसिकांनी चक्क चार वेळा वन्स मोर केला. रागधारीच विस्तृत अंगाने केलेलं सादरीकरण आणि तालाची विस्तृत बांधणी आणि स्वर्गीय साक्षात्कार घडवणाऱ्या तारसप्तकातील गायकीच अंग पंडित बलवल्ली यांच्या गायन मैफिलीला स्वर्गीय गंधर्व सभेच स्वरूप देऊन गेलं.जर्मनीतील आयोजकांच्या वतीने  मैफिलीत सहभागी झालेल्या स्वराधीश डॉक्टर पंडित भरतकुमार बलवल्ली आणि त्यांच्या बरोबरीने सर्व सहकारी कलाकारांचा जर्मनीतील विठ्ठल रखुमाई मंदिरात भव्य सत्कार करण्यात आला.आपल्या हिंदुधर्माच्या धार्मिक संस्कृतीचा जर्मनी सारख्या पाश्चात्य देशात आदर केला जातो व हिंदू धर्मातील संस्कृती जर्मन लोक श्रद्धेने आचरणात आणतात हा साक्षात्कार पाहून आपण भारावून गेल्याच पखवाज हुस्ताद डॉक्टर दादा परब म्हणाले.डॉक्टर दादा परब यांच्या या दैदीप्यमान  यशाबद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!