आपला जिल्हा आज झपाट्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. या जिल्ह्याच्या विकासासाठी अनेकांनी आपले योगदान दिले आहे. ज्यामध्ये बॅ. नाथ पै, मधू दंडवते, सुरेश प्रभू, नारायण राणे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. या सर्वांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा पिढी राजकारणामध्ये आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये एक नाव आवर्जून घ्यावे लागेल ते म्हणजे ऍड. यशवर्धन जयराज राणे.
यशवर्धन राणे यांचा जन्म २६ नोव्हेंबर २००० साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे झाला. घरातील सर्व सदस्य सुशिक्षित असल्यामुळे घरात शिक्षणाला फार महत्त्व होते. पण म्हणतात ना “मुलाचे पाय पाळण्यात दिसतात” त्याप्रमाणे यशवर्धन यांचा ओढा समाजसेवेकडे होता. शिक्षण सुरू असतानाच २०१८ साली त्यांनी ‘युवा फोरम’ या संस्थेची स्थापना केली. आज ही संस्था देशभरात कार्यरत आहे. आजवर या संस्थेने मिशन सिंड्रेला उपक्रमांतर्गत महिलांसाठी मासिक पाळी जनजागृती कार्यक्रम केले आहेत. तसेच गेली ५ वर्षे राज्यातील एक हजार महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप केले आहे. उमेद उपक्रमांतर्गत खेड्यात जाऊन वडीवस्तीवरील मुलांना शिक्षण दिले आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून शिक्षणाचे महत्व पटवून दिले आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात सध्याची पिढी मोबाईल आणि व्हिडिओ गेम्समध्ये अडकून पडली आहे. या पिढीला मैदानी खेळांचे महत्त्व पटवून देण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून कुडाळ येथे राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यभरातील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. कला क्षेत्राला प्रोत्साहन मिळावे यासाठी देखील अनेक कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आले आहेत.
एकंदरीत आरोग्य, शिक्षण, कला, क्रीडा या सर्व क्षेत्रांसाठी युवा फोरम या संस्थेच्या माध्यमातून यशवर्धन राणे यांनी आपले योगदान दिले आहे. त्यांच्या याच कार्यासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार २०१६, राष्ट्रपती पुरस्कार २०१८, सोनी पीच्चर्स नेटवर्क काईंडनेस आयकॉन २०२२, इन्फ्लूइंशियल इंडियन अवॉर्ड २०२४ या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
आपली समाजसेवेची आवड जपता यावी यासाठी त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. तसेच पक्षाच्या वाढीसाठी निष्ठेने काम केले. या काळात आपल्या हुशारीने त्यांनी आपल्या वरिष्ठांवर स्वतःची छाप सोडली. आज मंत्री उदय सामंत व उद्योजक किरण उर्फ भैया सामंत यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे.
आपले सामाजिक कार्य सुरू असताना त्यांनी शिक्षणाकडे मात्र कधीही दुर्लक्ष केला नाही. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एल.इल.बी. ही पदवी संपादन करून ते आपल्या कुटुंबातील पाहिले वकील बनले. आज काळा कोट आणि सफेद खादी यांच्यात उत्तम समन्वय राखून दोघांनाही समान न्याय देण्याचे काम ते करत आहेत.
यशवर्धन राणे यांनी आपल्या नावाप्रमाणेच यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. आपल्या हुषारीच्या जोरावर त्यांनी २०२२ साली संयुक्त राष्ट्राच्या युनिसेफ मध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व तर २०२३ साली युनिसेफच्या भारतीय युवा सल्लागार मंडळात स्थान मिळवले आहे. तसेच शिक्षण व आरोग्य मंत्रालय यांच्यासोबत सलग्न होऊन NEP (New Education Policy) वर काम केले आहे.
एकंदरीत यशवर्धन राणे हे एक युवारत्न असून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत झळकले आहे. दुर्दैवाने स्वतःच्या जिल्ह्यात मात्र हे युवारत्न अद्याप दुर्लक्षित राहिले आहे. भविष्यात एखादा रत्नपारखी येऊन या युवारत्नाची नक्कीच पारख करेल.
जिल्ह्यातील या दुर्लक्षित युवारत्नाचा वाढदिवस आहे. यशवर्धन या आपल्या नावाप्रमाणेच त्यांनी यशाचं उत्तुंग शिखर गाठू देत की साक्षात आकाशालाही त्यांचा हेवा वाटू दे याच शुभेच्छा…!