मुंबई प्रतिनिधी: महाराष्ट्रातील राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे, सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार बागपत जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच काँग्रेसने तातडीनं जिल्हाध्यक्षपदावरून युनूस चौधरी यांची हाकालपट्टी केली आहे.
प्रदेशाध्यक्षांकडून युनूस चौधरी यांच्या हाकलपट्टीसंदर्भातील एक पत्रक जारी करण्यात आलं आहे. शुक्रवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी युनूस चौधरी यांचा एका तरुणीसोबतचा अर्धनग्न अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. दरम्यान हा व्हिडीओ खोटा असून ही मला फसवण्यासाठी विरोधकांची चाल आहे, हा व्हिडीओ इडीट करण्यात आल्याचा दावा चौधरी यांनी केला आहे.दरम्यान याबाबत पोलीस स्थानकात अजून कुठलीही तक्रार दाखल झाली नसल्याचं पोलिसांनी म्हंटल आहे.