आदित्य ठाकरे यांची तिखट टीका
ब्युरो न्यूज: शायना एन सी यांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केलेल्या अरविंद सावंत यांनी आता याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे मात्र आदित्य ठाकरे यांना याबाबत प्रसार माध्यमांनी विचारले असता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे
अरविंद सावंत यांनी शायना एन सी यांना “माल” म्हंटले यावर तुमचं काय मत आहे अस विचारल असता आदित्य ठाकरे म्हणाले, अरविंद सावंत यांनी कोण एका व्यक्तीला नाही तर सर्व जे बाराच्या बारा व्यक्ती आहेत त्यांना म्हणाले आहेत. तरी देखील कोणाला वाइट वाटल असेल तर मी खेद व्यक्त करतो,मात्र त्याच (एकनाथ शिंदे) व्यक्तींनी गौरी लंकेशच्या मारेकऱ्यांना पक्षात घेतले आहे, बिल्कीस बानू च्या रेपिस्टच ज्यांनी स्वागत केलं त्याची आरती केली त्यावर बोलणं गरजेचं आहे,वामन म्हात्रे ज्यांनी एका पत्रकाराला विचारलं होत की तुमचा रेप झाला का?त्यांना विचारानं गरजेचं आहे.अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना घाणेरड्या शिव्या दिल्या टीव्ही वर त्यांना विचारनं गरजेचं आहे,संजय राठोड ज्यांच्यावर अतिशय वाइट आरोप आहेत त्यांना एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट मधे घेतलेलं आहे. त्यांना विचारन गरजेचं आहे.त्या एकनाथ शिंदेंवर बोलणं गरजेचं आहे. कारण निर्लज्ज कारभार हा एकनाथ शिंदे यांचा आहे असं आदित्य ठाकरे यावेळी बोलले.
सह्याद्री संस्कार शिबिर चे आयोजन