मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण शहरामध्ये मामा वरेरकर नाट्यगृह येथे राणे हॉस्पिटल रिचर्स सेंटर पुरस्कृत डॉ. जी. टी. राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हृदयरोग तपासणी आरोग्य शिबिर रविवार दिनांक २७/०७/२०२५ रोजी सकाळी ठीक १० वा. ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
तरी या आरोग्य शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ :- मामा वरेरकर नाट्यगृह मालवण, सकाळी १० ते दुपारी २.०० वा.पर्यंत