गणेशोत्सवा निमित्त कुडाळ वेंगुर्ल्यात घरोघरी पोहचले प्रा. डॉ. श्रीधर पेडणेकरांचे ‘गणपती पूजा किट’!

योगिता कानडे/कुडाळ : मांगल्य आणि उत्साहाच्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून शिवसेना ओबीसी व्हीजेएनटी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. श्रीधर पेडणेकर यांच्या संकल्पनेतून सिद्ध करण्यात आलेल्या विशेष ‘गणपती पूजा किट’ चे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ व वेंगुर्ला तालुक्यात या पूजा किटचे वाटप करण्यात येत असून, नागरिकांमधून या उपक्रमाचे जोरदार स्वागत केले जात आहे.

गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांना पूजेच्या साहित्यासाठी धावपळ करावी लागू नये आणि घरातील पूजा शास्त्रोक्त पद्धतीने पार पडावी, या उदात्त हेतूने प्रा. डॉ. श्रीधर पेडणेकर यांनी या पूजा किट वितरणाचा संकल्प सोडला आहे. या किटमध्ये पूजेसाठी लागणारे आवश्यक ते सर्व साहित्य समाविष्ट करण्यात आले आहे.

कुडाळ व वेंगुर्ला तालुक्यात विविध गावे, वाड्यांमध्ये प्रा. डॉ. पेडणेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून थेट भाविकांच्या दारापर्यंत पोहोचून हे शिवसेना पूजा किट सुपूर्त केले जात आहे.

गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा आणि आस्थेचा पावन सण आहे. या उत्सवात प्रत्येक घरातील गणेशपूजा निर्विघ्न आणि आनंदाने पार पडावी, या भावनेने आम्ही हे किट घरोघरी पोहोचवत आहोत. जनतेची सेवा हेच आमचे आद्य कर्तव्य आहे,” अशी प्रतिक्रिया याप्रसंगी प्रा. डॉ. श्रीधर पेडणेकर यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!