कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गणेश घाटावर प्रत्यक्ष पाहणी

कुडाळ : कुडाळात काल दीड दिवसांच्या बाप्पांचे थाटामाटात विसर्जन झाले. गणेशाच्या विसर्जनाच्या वेळी कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी कुडाळ शहरातील गणेश घाटावर भेट देऊन विसर्जन व्यवस्था व घाटावरील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

गणेश भक्तांना विसर्जनाच्या वेळी कोणतीही गैरसोय होऊ नये, सुरक्षितता अबाधित राहावी आणि संपूर्ण विसर्जन सोहळा शिस्तबद्ध व शांततेत पार पडावा, यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली.

यावेळी नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी, फॉरेस्ट अधिकारी, पोलीस प्रशासन तसेच कुडाळ शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुडाळ शहरातील प्रत्येक गणेशभक्ताच्या श्रद्धेचा आणि भावनेचा आदर राखत, प्रशासन व नागरिकांच्या सहकार्याने गणेश विसर्जनाचा हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडत आहे, याचा मनापासून आनंद होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!