४ भाविकांचा जागीच मृत्यू; ६ जण गंभीर जखमी
अयोध्या: महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या मिनी बसचा भीषण अपघात घडला आहे. मिनी बस रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या बिघडलेल्या पर्यटक बसला जाऊन धडकली. या अपघातात ४ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे.तर, ६ जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात लोणी कटरा पोलीस स्टेशन हद्दीतील पूर्वांचल एक्सप्रेसवर घडला आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलीस बचाव पथकासह घटनास्थळी पोहोचले आहेत.
मिनी बसमध्ये १८ प्रवासी प्रवास करत होते. ज्यात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, ६ जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये १ महिला तर ३ पुरूषांचा समावेश आहे. तसेच २ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात दोन्ही वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या घटनेनंतर चालक फरार झाला असून, पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.