ओव्हरटेक मारण्याच्या नादात शिवडाव फाट्यावर डंपर पलटी

ब्युरो न्यूज: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपघातांचं सत्र सुरूच आहे. दरम्यान आज संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास कणकवली शिवडाव फाट्यावर दोन डंपर मध्ये अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हनी झाली नाही.

सविस्तर वृत्त

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास शिवडाव फाट्यावर दोन डंपर एकामागून एक जात होते. दरम्यान मागे असलेल्या डंपर चालकाने आपल्या मालकीचा डंपर ओव्हरटेक करण्यासाठी पुढे नेला, मात्र पहिल्या डंपर च्या समोरून जाणारी बाईक त्याच्या जेव्हा निदर्शनास आली तेव्हा त्या बाईक स्वाराला वाचविण्यासाठी डंपर चालकाने अर्जंट ब्रेक लावल्यामुळे अपघात होऊन डंपर पलटी झाला.

error: Content is protected !!