जिल्हास्तरीय उदघाटन कार्यक्रम माडखोल येथे
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हास्तरीय पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन गुरुवार दि.१६ जानेवारी रोजी करण्यात आले आहे.या सराव परीक्षेचा जिल्हास्तरीय उदघाटन कार्यक्रम माडखोल नं.१ ता.सावंतवाडी या प्रशालेत संपन्न होणार आहे.
शिक्षक समिती सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील पूर्व माध्यमिक (इयत्ता ५ वी) शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ विदयार्थ्यांना मोफत सराव परीक्षेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.यावर्षी ही परीक्षा गुरुवारी जिल्ह्यातील १४४ केंद्रांवर संपन्न होणार असून परीक्षेस जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी समाविष्ट होणार आहेत.परीक्षेचा जिल्हास्तरीय उदघाटन कार्यक्रम माडखोल नं.१ येथे संपन्न होणार असून सदर कार्यक्रमास उद्घाटक म्हणून शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ.गणपती कमळकर,कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस,प्रमुख अतिथी म्हणून राज्यसरचिटणीस राजन कोरगावकर,राज्य कार्यकारिणी पदाधिकारी नामदेव जांभवडेकर,नीलम बांदेकर,प्रशांत मडगांवकर,संतोष परब,सचिन मदने,जिल्हा शिक्षक नेत्या सुरेखा कदम,जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, शिक्षक पतपेढी अध्यक्ष विजय सावंत,उपाध्यक्ष ऋतुजा जंगले,माजी जिल्हाध्यक्ष व संचालक नारायण नाईक,महिला आघाडी अध्यक्षा निकिता ठाकूर,सचिव वैभवी कसालकर,जिल्हा पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.तसेच प्रत्येक तालुक्यात तालुकास्तरीय उदघाटन कार्यक्रम मान्यवरांचे उपस्थितीत पार पडणार आहे.
सदर सराव परीक्षेत उत्तीर्ण जिल्हास्तरावर टॉप टेन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येतो तर तालुकास्तरावरही यशस्वी विदयार्थ्यांचा गौरव करण्यात येतो.सदर सराव परीक्षेस पात्र विदयार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी केले आहे.