शेतकऱ्यांना कशाला त्रास देता ? ७/१२, ८-अ जोडण्यापेक्षा फार्मर आयडी वर नुकसान भरपाई द्या

युवासेना तालुकप्रमुख योगेश धुरी यांची मागणी

🟪 कोकणातील शेतकरी हा कायम पॅकेज पासून वंचित असतो,
🟪 तोक्ते वादळाची मदत वगळता मोठं पॅकेज शेतकऱ्याला मिळला नाही
🟪 आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे वारेमाप नुकसान झाले आहे त्यात आपला शेतकरी पॅकेज पासून वंचीत असतो.
🟪 शेतकऱ्याला कशाला तो त्रास ७/१२ काढा, ८-अ काढा आणि धावपळ करत शेतकरी बिचारे कागद जमा करता आहेत त्यात नुकसानाचे फोटो हवेत असं काही ठिकाणी सांगितले गेल.त्यापेक्षा फार्मर आयडी वर नुकसान भरपाई द्या
🟪 काही ठिकाणी फार्मर आयडीला सगळे सर्वे नंबर समाविष्ट झाले नाहीत यात काय शेतकऱ्यांची काय चूक ?
🟪 सरकार बळीराजाच शोषण करीत आहे.
🟪 युवासेनेच्या वतीने आमची अशी मागणी आहे कि सदर नुकसान भरपाई फार्मर आयडी वर देण्यात यावी आणि शेतकऱ्यांचा त्रास कमी करावा.

error: Content is protected !!