मालवण शहरासाठीच्या क्रीडा संकुलसाठी ४ कोटींचा निधी मंजूर तर शहरातील विविध विकासकामांसाठी १ कोटींचा निधी.
आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मालवण शहरासाठी एकूण ५ कोटींचा विकासनिधी राज्य नियोजन विभागातून मंजूर करण्यात आला असून यात आमदार निलेश राणे यांची महत्वपूर्ण मागणी आणि मालवण शहरवासीयांना आमदार निलेश राणे यांनी निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पूर्ण झाला आहे. या क्रीडा संकुलात सर्व क्रीडा प्रकारांचा समावेश असलेले ग्राउंड, सर्व इनडोअर-आउटडोअर क्रीडा प्रकार समाविष्ट असतील. या क्रीडासंकुला सोबतच मालवण शहरातील विविध विकासकामांसाठी १ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली असून एकूण ५ कोटींचा निधी मालवण नगरपरिषदसाठी मंजूर झाला आहे. हा भरगोस विकासनिधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आमदार निलेश राणे यांनी आभार व्यक्त केले आहेत.