प.पू.आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली केरवडे तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत मांडकुली हायस्कूलची विद्यार्थीनी कु.राधिका राघोबा गावकर हिने 14 वर्षाखालील 100 मी धावणे या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावत उज्वल यश संपादन केले आहे.
तिच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून संपूर्ण शाळेचा आणि परिसराचा अभिमान वाढविला आहे. त्याला मार्गदर्शन प्रशालेचे विज्ञान शिक्षक श्री राहुल रविंद्र कानडे यांनी केले. कु. नमन सुर्यकांत भोई व प्रशालेचे शिक्षक श्री राहुल रविंद्र कानडे सर यांचे अभिनंदन प्रशालेचे संस्था अध्यक्ष श्री. श्रीधर पेडणेकर, संस्था सचिव श्री. अंकुश जाधव, खजिनदार श्री. देवदत चुबे, संस्था उपाध्यक्ष श्री. अर्जून परब, कार्याध्यक्ष श्री. वामन गावडे व मुख्याध्यापक श्री सुरेंद्र खोत सर्व संचालक, सभासद ,ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, पालक,व सर्व शिक्षणप्रेमी यांजकडून अभिनंदन होत आहे.