माणगाव येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत पांग्रड हायस्कूलचे यश

कुडाळ : माणगाव येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत पांग्रड हायस्कूल ने विशेष यश संपादन केले आहे.

माणगाव येथे नुकतीच तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत ३ किमी धावणे या क्रिडाप्रकारात १७ वर्षीय वयोगटात एन. व्हि. कुलकर्णी विद्यामंदिर पांग्रड या शाळेची विद्यार्थिनी आणि निरुखे गावची सुकन्या नेहा संतोष तेरसे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या कामगिरीमुळे प्रशालेच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा रोवला गेला असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!