चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबई संचलित आपल्या श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे आज शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ व सौ.रश्मी देवेंद्र नाईक संस्था सदस्य व माजी उपसरपंच यांच्या सौजन्याने नववी व दहावीच्या 20 विद्यार्थ्यांची कलचाचणी सकाळी 11 वाजता घेण्यात आली याप्रसंगी शाळा समिती अध्यक्ष मा. श्री देवेंद्र नाईक, श्री संजय परब संस्था सदस्य व माऊली देवस्थान कमिटी अध्यक्ष त्याचबरोबर ज्यांच्या सहकार्याने आज ही परीक्षा घेतली जात आहे त्या सौ.रश्मी देवेंद्र नाईक संस्था सदस्य व माजी सरपंच चेंदवण उपस्थित होते . त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि या परीक्षेचे महत्त्व सांगितले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री माणिक पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे विद्यालयाच्या व संस्थेच्या वतीने स्वागत केले आणि विद्यार्थ्यांना परीक्षेविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशालेतील सहा. शिक्षक श्री शरद नाईक यांनी केले. या कार्यक्रमास प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक संतोष सांगळे व सौ.उर्मिला गवस उपस्थित होते.या विद्यार्थ्यांची पालकांसोबत समुपदेशन पुढील कांही दिवसात होणार आहे व विद्यार्थ्यांचा कल तपासला जाणार आहे.यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक मार्ग सापडण्यासाठी मदत होणार आहे.यासाठी होणारा आर्थिक भार सौ.रश्मी देवेंद्र नाईक व इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ यांनी उचलला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही संधी प्राप्त करून दिल्याबद्दल इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ व सौ.रश्मी देवेंद्र नाईक यांचे चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबई या संस्थेच्या, शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे.
1
/
100
माजी खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात कुडाळात निदर्शने #kudal #vinayakraut
नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न #kankavli
गुणवत्ता हि आजच्या काळातील खरी संपत्ती - नगराध्यक्ष संदेश पारकर #kankavli #sandeshparkar
कणकवलीच्या विकासासाठी योग्य तो निर्णय घेणार | संदेश पारकर एक्सक्लुझिव्ह मुलाखत | वाढदिवस विशेष
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकरयांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत #kankavli #sindhudurg
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा भावी खासदार म्हणुन उल्लेख.... #kankavli #sindhudurg
संदेश पारकर यांच्या वाढदिवसाचे उपक्रम म्हणजे कलेची नांदी - प्रसाद राणे #kankavli #sandeshparkar
लवकरच सर्व कर्मचाऱ्यांना कामाचे लेखी आदेश दिले जातील #kudal #sindhudurg
आम्हाला ३-४ महिने पगार मिळत नाही #kudal #sindhudurg
संदेश पारकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार - सुशांत नाईक #kankavli #sindhudurg
हिंमत असेल तर अंकुश जाधव यांनी मोर्चा काढून दाखवावा - संदीप कदम #sindhudurg
वेताळ बांबर्डे (कदमवाडी) येथे विहिरीत पडला बिबट्या
1
/
100


Subscribe










