सावंतवाडीत बँक कर्मचारी बंद खोलीत सापडला मृतावस्थेत

सावंतवाडी: सावंतवाडी शहरात एका राष्ट्रीयकृत बँकेत काम करणारा कर्मचारी आपल्या भाड्याच्या खोलीत मृतावस्थेत आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सदर इसमाचे नाव अभिषेक प्रविण सोरेंग (वय ३२. सध्या रा. माठेवाडा. मूळ रा. छोरीबिंदा. झारखंड )असून याबाबतचे वृत बँकेचे व्यवस्थापक शरद शिवाजी पेडामकर यांनी सावंतवाडी पोलिसात दिली आहे.

दरम्यान झोपेतच त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.अभिषेक प्रविण सोरेंग हे शहरातील एका राष्ट्रीयीकृत बँकेत अधिकारी म्हणून काम करत होते. त्यांची २०२२ पासुन सदर बैंकेत नेमणूक झाली होती.

सविस्तर वृत्त काय आहे?

शुक्रवारी १० जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे मृत व्यक्ती अभिषेक सोरांगे बँकेचे काम करून रात्री ८.३० च्या सुमारास घरी परतले होते.सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास अभिषेक सोरेंग यांचा भाऊ अभिनव सोरेंग याने सदर बँकेच्या शाखा व्यवस्थापकांच्या फोनवर फोन करुन सांगितले कि आभिषेक हा गेले दोन दिवसापासुन फोन उचलत नाही तुम्ही त्याचे रुमवर जावुन पहा. त्यानुसार बँक व्यवस्थापक शरद पेडामकर यांनी याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांना दिली.

Oplus_131072

त्यानंतर पोलीसांनी त्यांचे सोबत अभिषेक सोरेंग राहत असलेल्या माठेवाडा येथील गणेश रेसिडेन्सी येथे त्यांच्या खोलीकडे जावुन पाहिले असता खोलीला आतुन कडी लावलेली होती.यानंतर बँक व्यवस्थापकांनी आम्ही खोलीचे मालक पुंडलिक दळवी यांना बोलावुन घेवुन त्यांना सदरची घटना सांगितली व रुमचा दरवाजा उघडुन रुमच्या बेडरुम मध्ये गेले असता आभिषेक हा गादीवर उजव्या कुशीवर झोपलेला दिसला. त्याला उठविण्याचा प्रयत्न केला असता त्याची कोणतीही हालचाल दिसुन आली नसल्याने त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे आणले असता डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *