सिंधुदुर्ग : जिल्ह्यामध्ये आधारभूत संगणकीय या दृष्टीने ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून विनामूल्य संगणक शिबिरे राबवली जातात याचाच एक भाग म्हणून मालवण तालुक्यातील दुर्गम अशा हेदुळ गावातील प्राथमिक शाळेमध्ये दहा दिवसीय संगणक प्रशिक्षण सुरू करण्यात आले. उद्घाटन समयी दीप प्रज्वलन करून व शारदा मातेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन झाले. व्यासपीठावर ग्लोबलचे व्यवस्थापक श्री प्रसाद परब सर, प्रशिक्षक श्री स्वप्निल नाईक सर सहाय्यक श्री उमेश गावडे सर, मुख्याध्यापक श्री शामसुंदर सावंत, श्री दयाल मेस्त्री व अन्य शिक्षिका उपस्थित होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये श्री प्रसाद परब सर यांनी ग्लोबल च्या विविध उपक्रमाची माहिती दिली व नियोजित संगणक प्रशिक्षणाची रूपरेषा सांगितली. या उपक्रमामध्ये २४ विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला आहे. संगणकाचे प्राथमिक ज्ञान व त्यावर आधारित सराव सत्र प्रशिक्षक श्री स्वप्निल नाईक सर यांच्या द्वारे या प्रशिक्षणामध्ये देण्यात येणार आहे. दुर्गम भागामध्ये मिळणाऱ्या या प्रशिक्षणाबद्दल ग्रामस्थांनी व हेदुळ गावच्या सरपंच सौ प्रतीक्षा पांचाळ व ग्रामपंचायत सदस्य यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.













