गोवा बनावटीच्या दारूसह ४२ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त

चंदगड पोलिसांची कारवाई

दोडामार्ग : गोवा बनावटीची दारू तिलारी घाट माथ्यावर नेत असताना चंदगड पोलिसांनी कारवाई केली. यात एकूण 42 लाख 12 हजार 880 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत मोठी कारवाई केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र जुगार, दारू व सर्वच अवैद्य धंद्यांविषयी एक अभियान हाती घेतलेले असताना सिंधुदुर्गच्या चेक पोस्टवरून ही अवैध दारू घाट माथ्यावर गेलीच कशी? या संदर्भात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घाट माथ्यावर जाण्यासाठी एकतर दोडामार्ग विजघर चेकपोस्ट व दुसरे आंबोली चेकपोस्ट अशी दोन चेक पोस्ट आहेत. गोवा बनवटीची दारू घाट माथ्यावर वाहतूक करताना याच दोन चेक पोस्टचा अवैध धंदेवाले उपयोग करतात. पालकमंत्री नितेश राणे यांची अवैध धंद्यावर धडक कारवाई नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैद्य धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. काही दिवस गुटखा, दारू जुगार सिंधुर्गात बंद ठेवण्यात आला होता मात्र पुन्हा अवैद्य धंदे करणाऱ्यांनी डोके वर काढून अवैद्य धंदे सुरू केले आहेत. दोडामार्ग तालुक्यातून वीज घर चेक पोस्ट दिलारी घाट, कुंभवडे, मांगेली या सारख्या मार्गारून मोठ्या प्रमाणात दारू, गुटखा, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे मांस खुलेआम वाहतूक केले जाते. हे कोणाच्या आशीर्वादाने केले जाते? याचा मुख्य आका कोण? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

error: Content is protected !!