मुंबई प्रतिनिधी: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना नियोजन सोपे जावे यासाठी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार २०२५ मध्ये सुधारित रचनेसह नागरी सेवा पूर्व परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याचे नियोजित आहे. त्यापूर्वी, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित मुख्य परीक्षा २०२४ चे आयोजन एप्रिलमध्ये घेण्याचे नियोजित आहे.
२०२५ मध्ये होणाऱ्या परीक्षांच्या संभाव्य तारखा
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा २०२४ – १ डिसेंबर २०२४ रोजी घेतली जाईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ – ५ जानेवारी २०२५ रोजी, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ – २ फेब्रुवारी २०२५ रोजी, राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ – २६ ते २८ एप्रिल २०२५ रोजी, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ – १० ते १५ मे २०२५ रोजी, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ – १८ मे २०२५ रोजी, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ – १८ मे २०२५ रोजी, महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४- १ जून २०२५ रोजी, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ – २९ जून २०२५ रोजी. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा २०२५ – २८ सप्टेंबर २०२५ रोजी, महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्तपूर्व परीक्षा २०२५ – ९ नोव्हेंबर २०२५ रोजी आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ – ३० नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित केली जाईल.