चिपि (सिंधुदुर्ग) विमानतळ खरोखरच बंद झाले का?

सिंधू दर्पण विशेष: सिंधुदुर्ग फक्त मुंबई वरून येणाऱ्या जाणाऱ्या फ्लाईट बंद झाल्या. विमानतळ चालूच आहे, यात पुणे, हैदराबाद आणि बेंगळूर च्या फ्लाईट चे बुकिंग चालू आहेअसे समजतेमुंबई फ्लाईट बंद म्हणजे संपूर्ण विमानतळ बंद असा गैरसमज होऊ शकतो कदाचितकाही दिवसापूर्वी मुंबई फ्लाईट पुन्हा सुरू होणार अशी बातमी थडकली होती.ही सेवा अजून सुरू झाली का याची कल्पना नाही कारण संकेतस्थळावर तसे काही आढळून येत नाही.धक्कादायक बाब म्हणजे हैदराबाद आणि बेंगळूर विमान सेवाही बंद झाल्याचे fly९१ च्या संकेत स्थळावर अप्रत्यक्ष रीत्या आढळून आले आहे. अप्रत्यक्षरीत्या हा शब्दप्रयोग अशा साठी वापरला की फ्लाइट्स दाखवत आहेत मात्र सर्व sold out दाखवत आहेत. या दोन्ही ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या सर्व फ्लाईट्स पुढील अमर्याद कालावधी साठी पूर्णपणे sold-out असणे अशक्य आहे. कारण काहींनी या फ्लाईट मधून प्रवास केलेला आहे, अगदी हातावर मोजण्या एवढ्याच सीट बुक असतात.फक्त पुण्याला जाणाऱ्या व येणाऱ्या फ्लाईट चे बुकिंग चालू / उपलब्ध आहे. निवडणुकीच्या धामधुमीत याकडे कुणाचे लक्षच नसल्याने त्या लोक प्रतिनिधींनी लक्ष देण्याची विषेश गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *