२४ फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी
कणकवली प्रतिनिधी: कणकवली, वैभववाडी, देवगड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उद्या कणकवली महाविद्यालच्या एचपीसीएल सभागृहात सकाळी ८ वाजल्यापासून मत मोजणीला सुरूवात होणार आहे. ६ टेबलवर टपाली तर १४ टेबलवर ईव्हीएम मशीनद्वारे मतमोजणी होणार आहे. एकूण २४ फे-यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. यासाठी ११६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
कणकवली विधानसभेचा निकाल दुपारपर्यंत लागण्याची शक्यता
कणकवली विधानसभेचा निकाल दुपारपर्यंत लागण्याची शक्यता असल्याचे निवडणूक निर्णय अधिकार जगदीश कातकर यांनी सांगितले.मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, कणकवली कॉलेज मध्ये चोख बंदोबस्त पोलीसांचा ठेवण्यात आला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात एकूण ३३२ मतदान केंद्रे असून यासाठी एकूण १४ टेबलवर मतमोजणी होताना, प्रत्येक ठिकाणी ३ कर्मचारी व टपाली मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर ४ कर्मचारी व इतर ५० कर्मचारी मिळून ११६ कर्मचारी काम पाहणार आहेत. एका फेरीत १४ केंद्रांची मतमोजणी होणार आहे. एकूण २४ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण करण्यात येणार आहे. त्यावर नियंत्रण करण्यासाठी अधिकार असणार असल्याचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी सांगितले.
पक्षातील कार्यकर्त्यांसाठी जागा निश्चित
या मतमोजणीसाठी महाविकास आघाडी व महायुतीच्या कार्यकर्त्यांना उभं राहण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार कणकवली येथील संजीवनी हॉस्पिटल परिसर महायुतीचे उमेदवार नितेश राणे, अपक्ष उमेदवार संदेश परकर, कणकवली नगरपंचायत रोड महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर अपक्ष उमेदवार गणेश माने आणि कणकवली तहसिल कार्यालय येथे अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी, बहुजन समाज पार्टीचे चंद्रकांत जाधव यांच्य कार्यकर्त्यांसाठी प्रशासनाकडून जागा निश्चित करण्यात आली आहे. मतमोजणी काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी २५ पोलीस अधिकारी, १५० पोलीस, २ दंगल नियंत्रण पथके तैनात करण्यात येणार असल्याची माहिती कणकवली पोलीस निरिक्षक मारुती जगताप यांनी दिली.कणकवली विधानसभा मतदारसंघात खरी लढत विद्यमान आमदार नितेश राणे विरुध्द महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्यात आहे. दोन्ही उमेदवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. मात्र मतदारांचा कौल कोणाच्या बाजुने लागणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.