आर. पी. आय. नेते रतनभाऊ कदम यांनी दिली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोणावळा येथील स्मारकाला भेट

लोणावळा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) नेते रतनभाऊ कदम यांनी लोणावळा शहराला तसेच शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट दिली. यावेळी आर. पी. आय. चे प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे, मावळ तालुका कार्याध्यक्ष अशोक सरोदे, मावळ तालुका उपाध्यक्ष मिलिंद भालेराव, लोहा शहर अध्यक्ष कमलसिंह मस्के, रविंद्र जाधव, राजू चवरे, जयराम कदम, महेंद्र देसाई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रतनभाऊ कदम आर. पी. आय. चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. तसेच पक्षाच्या वाढीसाठी राज्यभर कार्यरत असतात. आज देखील त्यांनी पक्षकार्यासाठी त्यांनी लोणावळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देऊन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या.

error: Content is protected !!