पुणे: पावसाळ्याला सुरुवात झाली की हजारो पर्यटकांची पावले वर्षा विहारासाठी मावळ तालुक्यातील अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळांकडे वळतात.
Oplus_131072
आज रविवारी सुट्टीच्या दिवशी प्रसिद्ध कुंडमळ्याला पर्यटकांनी गर्दी केली होती. येथीलच इंद्रायणी नदीवरील पुलावरून पर्यटक जात असताना पूल अचानक खचला, खाली कोसळला असून यात दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
काय आहे सविस्तर वृत्त?
मावळजवळील तळेगाव दाभाडेनजीक कुंडमळ्याजवळ एक पूल आहे. हा पूल बराच जुना असल्यामुळे जीर्ण झाला होता, तसंच मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूल खचलाही होता. यानंतर आज दुपारच्या सुमारास हा पूल कोसळला. इंद्रायणी नदीवर असलेला हा पूल कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 ते 25 पर्यटकही वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.