राजन साळवी शिंदे गटात, विनायक राऊतांवर गंभीर आरोप

ठाणे : ठाकरेंचे माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. प्रवेश केल्यावर साळवी म्हणाले, की “शिवसेनेत प्रवेश करणं हे माझं भाग्य आहे”. तसेच त्यांनी विनायक राऊतांवर गंभीर आरोपही केले. “विनायक राऊतांमुळे माझं मंत्रिपद हुकलं. वाट चुकलो होतो. आज कुटुंबात आलो. एकनाथ शिंदेंनी छोट्या भावासारखे कुटुंबात घेतले. विनायक राऊतांनी किरण सामंतांचं काम केलं. आज खऱ्या अर्थाने समाधानी आहे”, असंही ते म्हणाले.

error: Content is protected !!