सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रामगड सरपंच शुभम मटकर यांची निवड
राज्य ग्रामीण विकास संस्था, यशदा पुणे यांच्यामार्फत पंचायत प्रगती निर्देशांक २.० चे पुणे येथे ३ जुलै ते ५ जुलै पर्यंत ३ दिवसीय निवासी प्रशिक्षण आयोजित केले असून हे प्रशिक्षण ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पालघर नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा जिल्हासाठी आयोजित केले गेले आहे . या प्रशिक्षणातून प्रवीण प्रशिक्षक तयार केले जाणार असून या प्रवीण प्रशिक्षकांनी स्वतःच्या जिल्ह्यामध्ये सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना पंचायत प्रगती निर्देशांक २.० बाबत प्रशिक्षण द्यायचे आहे. या प्रशिक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रामगड ग्रामपंचायतीचे सरपंच श्री शुभम विष्णु मटकर यांना नामनिर्देशित केले असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची पंचायत प्रगती निर्देशांकांचे प्रवीण प्रशिक्षक म्हणून नेमणूक होणार आहे.
याबाबत रामगड गावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सरपंच शुभम मटकर यांना शुभेच्छा दिल्या असून सरपंच शुभम मटकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधत्व करणायची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती मालवण चे आभार मानले आहे