स्वारगेट बलात्कार प्रकरणात मोठी माहिती समोर

आरोपी दत्तात्रय गाडेने दिलापोलिसांना जबाब

पुणे: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. मी त्या बसचा वाहक आहे असं खोटं सांगत आरोपीने त्या तरुणीवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. तसा जबाब बसच्या ड्रायव्हरने पोलिसांना दिल्याची माहिती आहे. महत्त्वाचं म्हणजे स्वारगेट ते सोलापूर जाणारी ती बस विनावाहक होती. त्यामुळे आरोपीने त्या तरुणीची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा अद्याप फरार आहे.

नेमकं काय घडलं?

मंगळवारी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी एसटीबस (एच 06 BW 0319) स्वारगेट आगारात पोहचली होती. त्यावेळी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान आरोपीने हे कृत्य केलं. फलटणला जाणाऱ्या तरुणीला त्याने या बसचा वाहक असल्याचं सांगितलं. या बसमध्ये गेली 15 वर्षे आपण ड्रायव्हर असल्याचं त्याने सांगितलं आणि तो तिला त्या बसमध्ये घेऊन गेला. त्यानंतर त्याने त्या तरुणीसोबत गैरकृत्य केलं.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी कारवाईचा बडगा उगारला. सरनाईकांनी स्वारगेट डेपोमधील 23 सुरक्षारक्षकांचे तात्काळ निलंबन केलं आहे. त्याचवेळी गुरुवारपासून नवीन सुरक्षारक्षक कामावर रुजू करण्याचे आदेश दिलेत. तसंच डेपो मॅनेजर, वाहतूक नियंत्रकांची चौकशी करून आठवड्याभरात अहवाल सादर करण्याचेही निर्देश त्यांनी दिलेत.

error: Content is protected !!