इन्सुली: गोव्याच्या दिशेने वाळू वाहतूक करणारा डंपर इन्सुली कोठवळेबांध येथे पन्नास फुट खोल दरीत कोसळला. हा अपघात गुरुवारी मध्यरात्री मुंबई गोवा महामार्गवरील येथे घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र डंपरचे फार मोठे नुकसान तर डंपरमधील वाळूचे नुकसान झाले. याबाबतची कोणतीच नोंद पोलिसात नव्हती. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कुडाळहुन गोव्याच्या दिशेने वाळू वाहतूक करणारा डंपर इन्सुली कोठावळेबांध येथे आला असता महामार्गवरून खोल दरीत कोसळला. मात्र डंपर कशामुळे खाली कोसळला हे मात्र समजू शकले नाही. सदरची दरी पन्नास फूट खोल असून एवढ्या वरून वाळूने भरलेला डंपर दरीत कोसळल्याने डंपरचे फार मोठे नुकसान झाले. तर आत मध्ये असणारी वाळूसुद्धा शेतात सांडून नुकसान झाले. सदरचा अपघात गुरुवारी मध्यरात्री झाला असावा असा अंदाज स्थानिकांचा आहे. अपघाताचे वृत्त समजताच स्थानिकांनी पहाटे मोठी गर्दी केली होती. याबाबतची नोंद पोलिसात नव्हती.

वाळू वाहतूक करणारा डंपर पन्नास फुट खोल दरीत कोसळला
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111

Subscribe










