मालवण हादरले! सावत्र बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

आई माहेरी असताना घडला संतापजनक प्रकार

आचरा पोलिसांची कारवाई, संशयिताला अटक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच नराधम सावत्र वडिलाने लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित मुलीची आई काही दिवसांसाठी माहेरी गेलेली असताना, या नराधमाने रात्रीच्या सुमारास राहत्या घरी या अल्पवयीन मुलीवर बळजबरी केली आणि हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

आई माहेरहून परतल्यानंतर पीडितेने घडलेला प्रकार अत्यंत धैर्याने आईला सांगितला, ज्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी पीडितेच्या आईने आचरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली.

तक्रार प्राप्त होताच आचरा पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत सहायक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे

error: Content is protected !!