आवेरेत भक्तिमय वातावरणात घरगुती गणपतींचे विसर्जन.

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात वाडी-वाडीतून घरगुती गणपतींचे विसर्जन.

कुडाळ तालुक्यातील आवेरे गावात सात दिवसांसाठी विराजमान झालेल्या घरगुती गणपती बाप्पांना रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला.

सात दिवस घराघरांत गणरायाची मनोभावे पूजा, आरती आणि विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर कुटुंबीयांनी लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाची तयारी केली. फुलांनी सजविलेल्या गणेशमूर्ती घेऊन कुटुंबीय व ग्रामस्थ वाडी-वाडीतून विसर्जनस्थळी दाखल झाले.

यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषाने आवेरेतील वातावरण भक्तिमय झाले होते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी विसर्जन मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग घेतला.

सात दिवसांच्या सहवासानंतर बाप्पाला निरोप देताना अनेक भाविकांच्या डोळ्यांत विरहाचे भाव दिसून आले. भक्तिभाव, उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात आवेरे गावातील घरगुती गणपतींचे सातव्या दिवसाचे विसर्जन पार पडले.

error: Content is protected !!