कुडाळ : गुरुवार दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी पूर्ण प्राथमिक शाळा वेताळ बांबर्डे नं १ या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी अनेकांनी मदतीचे हात पुढे केले .माझी शाळा ही भावना ठेवून सर्व पालकांनी हा कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. कार्यक्रमाचे खास आकर्षण होते ते म्हणजे दशावतारी नाटक विरसुर वध. या नाटकाची निर्मिती, नेपथ्य व दिग्दर्शन नाईक भाऊजी यांनी केले. या नाटकाला हार्मोनियम वादक यश – बांबर्डेकर, पखवाज वादक – यतीन सामंत, तलारक्षक – हेमंत सावंत यांची साथ लाभली. रंगभूषा राजा कुंभार, हेमंत सावंत, बंड्या सावंत तर वेशभूषा ऋषी घाडी, नागेश गोडकर, सुचिता नाईक यांनी केली.
अशा प्रकारे हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल पूर्ण प्राथमिक शाळा वेताळ बांबर्डे नं १ चे अध्यक्ष सखाराम सावंत यांनी सर्वांचे आभार मानले.