ब्युरो न्यूज : तीन दिवसांपूर्वी साटेली भेडशी थोरलेभरड येथे तिलारी धरणाच्या डाव्या कालव्यात पडलेल्या दुसऱ्या कामगाराचा मृतदेह तिलारी कालवा फुटल्याने पाणी बंद झाल्यावर शुक्रवारी रात्री दोडामार्ग म्हावळणकरवाडी नजीक आढळून आला. या नंतर पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.
खानयाळे येथे एका फार्म हाऊस वर काम करणारे धारवाड कर्नाटक येथील कामगार सोमवारी रात्री उशिरा कामाच्या ठिकाणी जात असताना डाव्या कालव्यात पडले होते. यात एकाचा मृतदेह सापडला होता. तर दुसरा बेपत्ता होता. गुरूवारी गुन्हा अन्वेषण विभाग पोलिसांनी शोध घेतला होता. शुक्रवारी तिलारी कालवा फुटला यामुळे पाणी पुरवठा बंद झाला यामुळे काही जणांना दुसरा मृतदेह कालव्यात सडलेल्या स्थितीत आढळून आला. मंजूनाथ अर्जुन होडगे असे त्याचे नाव आहे.