अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी ताब्यात

मुंबई: अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी मध्यरात्री भीषण हल्ला झाला. हल्ला झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. या फरार आरोपीच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी जंगजंग पछाडलं. त्याच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी ३० पथकेही तैनात केली होती. अखेर एका संशयिताला छत्तीसगडच्या दुर्गा रेल्वे स्थानकातून ताब्यात गेण्यात आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आज दुपारी एका संशयिताला दुर्ग येथे ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कसा लागला पोलिसांना छडा

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोलकाता शालिमारपर्यंत धावणाऱ्या ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमध्ये हा संशयित आरोपी होता. ही रेल्वे एलटीटी येथून ८.३५ वाजता निघते, तर ४.३५ वाजता शालिमार येथे पोहोचते.मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलं, ट्रेनमध्ये चढलेल्या एका व्यक्तीचा शोध घेण्यासाठी त्याचा फोटो आरपीएफला पाठवण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे छत्तीसगडमधील आरपीएफने जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं. यानंतर मुंबई पोलिसांचं एक पथक हवाईमार्गे छत्तीसगडला पोहोचले आणि त्याला ताब्यात घेतलं. पोलीस आणि आरपीएफ त्याची चौकशी करत आहेत. दरम्यान, त्याचं नाव आकाश कनौजिया असून मुंबई पोलीस अधिक चौकशी करणार आहेत.

error: Content is protected !!