अश्लील व्हीडिओ व्हायरल प्रकरणातील आरोपीला सशर्त जामीन

अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला संशयित आरोपी अमन जावेद मेमन याला सिंधुदुर्ग येथील विशेष न्यायालयाने दिलासा दिला आहे. विशेष न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी यांनी आरोपीची ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तितक्याच रकमेच्या एका सक्षम जामीनदारावर सशर्त सुटका करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी संशयिताच्या वतीने अ‍ॅड. सौरव देसाई यांनी न्यायालयात बाजू मांडली.

जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान बचाव पक्षाने न्यायालयात महत्त्वपूर्ण युक्तिवाद केला. ही कथित घटना मार्च २०२३ मधील असली तरी एफआयआरमध्ये निश्चित तारीख नमूद नाही, तसेच जुलै २०२६ मध्ये व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याशिवाय घटना घडली तेव्हा तक्रारदार अल्पवयीन होती, मात्र तक्रार दाखल होताना ती सज्ञान झाली होती, असाही युक्तिवाद मांडण्यात आला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि परिस्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने जामीन मंजूर केला. याप्रकरणी सिंधुदुर्ग सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम, पोक्सो आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल आहे.

error: Content is protected !!