विद्यार्थ्यांच्या स्वरातून जागला राष्ट्रप्रेमाचा सूर

वेंगुर्ल्यात देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न.!

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सांघिकता, शिस्त, संस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी, तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने विशाल परब मित्रमंडळ व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा-२०२६ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

वेंगुर्ला हायस्कूल येथे झालेल्या या स्पर्धेला भाजपा महाराष्ट्र युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीने विशेष रंगत आली. तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.

यावेळी भाजपा महाराष्ट्र युवा नेते विशाल परब म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या मनात लहानपणापासूनच राष्ट्रप्रेमाची भावना रुजवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. देशभक्तीपर गीतांमधून विद्यार्थ्यांमध्ये देशाबद्दलचा अभिमान, राष्ट्रीय एकात्मता आणि संस्कार अधिक दृढ होतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने झाले पाहिजे.”

या स्पर्धेत वेंगुर्ला तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

“चला, विद्यार्थ्यांच्या स्वरातून जागवूया राष्ट्रप्रेम!” या संदेशातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्यासमवेत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक, नगरसेविका ॲड. सौ. सुषमा खानोलकर, आकांक्षा परब, काजल कुबल, रिया रेडकर, नगरसेवक प्रणव वायंगणकर, प्रितम सावंत, वृंदा गवंडळकर, जेष्ठ परिक्षक शांताराम आसोलकर, परिक्षक भास्कर मेस्त्री, महेंद्र वायंगणकर, दिपेश परब, वेताळ प्रतिष्ठान तुळस चे अध्यक्ष डॉ. सचिन परुळेकर, सचिव विवेक तिरोडकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!