नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

कुडाळ तालुक्यातील हुमरमळा येथील घटना

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील हुमरमळा गाळवणीवाडी येथील रहिवासी व पाट हायस्कूल मध्ये नववी इयत्तेत शिकत असलेल्या,कु.युगा उमेश कानडे ( वय १५) या शालेय विद्यार्थ्यांनीने रविवारी ( ९ ऑगस्ट) सकाळी सुमारे ११ च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.कु.युगा ही पाट हायस्कूल मध्ये नववीच्या वर्गात शिकत होती.मात्र,या आत्महत्येचे नेमक कारण समजू शकले नाही.या घटने बाबत निवती पोलिस स्टेशनमध्ये हुमरमळा पोलिस पाटील श्री. सुबोध सावंत यांनी कळविले.तात्यांनंतर यावेळी पंचनामा करून तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.रविवारी सायंकाळी तिच्यावर साश्रू नयनांनी अंतिम संस्कार करण्यात आले.यामुळे तिच्या पालकांना व नातेवाईकांना धक्काच बसला आहे.येथील गवंडी उमेश कानडे यांची ती एकुलती एक कन्या होती.गाळवणीवाडी येथील अंतिम संस्कारावेळी सर्वच स्तरातील लोक उपस्थित होते.हुमरमळा तिठ्ठा येथील दुकाने बंद ठेवून तिला श्रध्दांजली वाहण्यात आली.पुढील तपास निवती पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.

error: Content is protected !!