सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम एकाच प्लॅटफॉर्म व एकाच तिकीटावर
ब्यूरो न्यूज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईची लाईफ लाईन असलेल्या रेल्वे बद्दल एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे.आता मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम एकाच प्लॅटफॉर्म वर एकाच तिकिटावर मिळणार आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री ?
आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की,माननीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वात मुंबईच्या ट्रान्सपोर्टेशनचा सिंगल प्लॅटफॉर्म आम्ही तयार केला आहे. आतापर्यंत आपण मेट्रो बेस्ट असे सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आपण प्लॅटफॉर्मवर आणले होते.आपली सबर्बन सिस्टीम प्लॅटफॉर्मवर आणणे गरजेचे होते कारण ती मुंबईची लाईफ लाईन आहे.आज त्यालाही मान्यता मिळाली असल्यामुळे आता मुंबईच्या लोकांना सगळ्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम एकाच प्लॅटफॉर्म वर एकाच तिकिटावर वापरता येणार आहेत. ते पुढे म्हणाले की,प्रत्येकाला ॲपच्या माध्यमातून आपला ट्रॅव्हल प्लॅन तयार करता येईल.
Passengers can now travel across all public transport with a single ticket. आता मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम एकच प्लॅटफॉर्म व एकाच तिकीटावर वापरता येतील.