दिनांक २८ जानेवारी पासून विविध सांस्कृतिक तसेच आरोग्य वर्धक कार्यक्रमांचे आयोजन
कुडाळ: श्री. प. पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज यांचा ४० वा पुण्यतिथी महोत्सवा निमित्त गुरुवार दिनांक ३० जानेवारी २०२५ ते शुक्रवार ३१ जानेवारी २०२५पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीमध्ये विविध धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्य उपक्रम कार्यक्रमाने संपन्न होत आहे. त्याचेच औचित्य साधून या कालावधीमध्ये श्री सग्रह अनघा दत्त याग अनुष्ठान बाम्हणाच्या हस्ते संपन्न होत आहे. तरी सर्व भाविकांनी या पुण्यतिथी उत्सव सोहळ्याचा, धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक कार्यक्रमाचा तसेच अखंड महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजक सद्गुरू राऊळ महाराज संस्थान श्री क्षेत्र पिंगुळी यांच्याकडून करण्यात आली आहे.
या महोत्सवाचे औचित्य साधून हा सोहळा दैदिप्यमान करण्यासाठी अनेक सांस्कृतिक तसेच अध्यात्मिक कार्यक्रम दिनांक २८ जानेवारी २०२५ पासून होणार आहे.
दिनांक २८ जानेवारी पासून होणारे कार्यक्रम:
मंगळवार २८ जानेवारी: सकाळी ७.०० वाजता: श्री.प. पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज यांच्या ‘वर्णावी ती थोरी’ या लीलामृताचे सामुदायिक पारायण.
बुधवार दिनांक २९ जानेवारी: दुपारी ४.०० ते ६.०० वा हळदीकुंकू समारंभ.
गुरुवार दि ३०/०१/२०२५ (माघ शु. १ शके १९४५)
पहाटे ५.३० वा.: नित्य काकड आरती
सकाळी ७.००ते १२.०० वाजता : शांतीपाठ, देह शुद्धी, प्रयाश्चित्त विष्णु सहस्रनाम जप, गानहणे, गणेश पूजा, पुण्यहवचन, नंदी श्राद्ध, आचार्य वरण, प्रकार शुद्धी, ब्रह्मादी मंडल देवता पूजा, प्रधान देवता (अवघ दत्त) पूजा, अग्निस्थापना, पूजा महाप्रसाद
सकाळी १०.०० ते दुपारी ०१.०० पर्यंत: १) मोफत कृत्रिम जयपूर फुट मोजमाप शिबीर श्री. प. पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज चॅरीटेबल ट्रस्ट, पिंगुळी यांच्या मार्फत व रोटरी लोककल्याण मंडळ कोल्हापूर रुग्णोपयोगी साहित्य वितरण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने.टीप : मोजमाप घेतलेले फुटचे वितरण १३ मार्च २०२५ ला श्री. प. पू. विनायक अण्णा महाराज ८० वा जयंती उस्तव दिवशी करण्यात येईल.
२) मोफत हाडांची तपासणी (Bone Mineral Dencity) मोफत मधुमेह तपासणी (सौजन्य – Mankind Pharma Itd. Discovery Div.) व सद्गुरू राऊळ महाराज संस्थान व श्री. प. पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी यांच्या विद्यमाने.
दुपारी १२.३० वा: महाराजांची महाआरती
दुपारी ०१.०० ते रात्री १०.०० वा. पर्यंत : अखंड महाप्रसाद
दुपारी १ ते ४ वा: जीवन विद्या मिशनचे स.श्री. वामनरावांनी उपासना यज्ञ व संगीत साधना.
दुपारी ४ ते ५.३० वा: श्री. प. पू. स. स. राऊळ महाराज महिला भजन मंडळ यांचे सुश्राव्य भजन (सप्तसूर)
सायं ५.३० ते ६.३० वा: श्री सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ, पावशी, कुडाळ यांचे सुश्राव्य भजन (बुवा – कुमार अरुण घाडी)
सायं ६.३० वा: महाराजांची महाआरती
रात्री 8.00 ते 9.00 वा: श्री महागणपती घुमट आरती आमोणा गोवा (सहकार्य-निळकंठ परब)
रात्री 9.00 ते 10.30 वाजता: श्री. अतुल इंदुलकर यांचे गुरुतत्वातून विश्वाचे कल्याण या विषयी सुश्राव्य प्रवचन.
(मुख्य दिवस) शुक्रवार दि ३१/०१/२०२५ (माघ २ शके १९४५)
पहाटे ५.३० वा: नित्य काकड आरती
सकाळी ६.०० वा: श्री. पी. बी. आवाज आवाज राऊल महाराज समाधी मंदिर अभिषेक आणि सार्वजनिक गायन शरीर शुद्धीकरण
सकाळी ७.०० ते दुपारी १२.००वा: स्थलशुद्धी, विष्णु सहस्रनाम जप, अनघा दत्त जप, अग्नि उपासना, मुख्य होम, यज्ञ, पूर्ण आहुती, अभिषेक, नैवेद्य, ब्राह्मण समभाव, यज्ञसांगता, गान्हाणे, तीर्थ प्रसाद, महाप्रसाद.
सकाळी १०.३० वा: श्री. प. पू. विनायक अण्णा महाराज समाधी मंदिरात पादुकापूजन.
दुपारी १२.३० ते १वा: महाराजांची महाआरती
दुपारी ०१.०० वा: श्री. प. पू. स. समर्थ राऊळ महाराज भक्त मंडळ आजरा पंचक्रोशी (चाफोडे गाव) यांच्या दिंडीचे आगमन (सहकार्य सुभाष आबा नलावडे)
दुपारी ०१.०० ते रात्रौ ११.०० वा. पर्यंत: अखंड महाप्रसाद
दुपारी ०१.०० ते ०२.००: श्री. भालचंद्र बाबा प्रासादिक भजन मंडळ कणकवली यांचे सुश्राव्य भजन (बुवा श्री. शशिकांत परब)
दुपारी ०२.०० ते ३.३०: श्री महादेव वारकरी प्रासादिक भजन मंडळ शिरवली-देवगड यांचे सुश्राव्य भजन (बुवा – श्री. सागर मोहिते)
दुपारी ०३.३० ते ४.३०: श्री स्वयंभू वारकरी चक्री भजन मंडळ पियाळी-कणकवली यांचे सुश्राव्य भजन (बुवा श्री. संतोष कानडे)
सायं ४.३०.०० ते ६.०० सायं ०६.३० वा: श्री राऊळ महाराज भक्त मंडळ मुंबई यांचे सुश्राव्य भजन श्रींची सांजआरती व पालखी मिरवणूक (प.पू.स.स. राऊळ महाराज समाधी स्थान ते जन्मस्थानापर्यंत (दिंडी) (आई माऊली महिला ढोलपथकाच्या ढोलवाद्याच्या गजरात)
रात्री 8 ते 10.30 वा: श्री. ज्ञानेश्वर माऊली वारकरी भजन मंडळ शिरोडाश्री देवी पावणाई लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ – कुसगाव
रात्री. १०.३० वा: लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री. कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर यांचा महा-पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग
खास आकर्षण :या कार्यकमाचे थेट प्रक्षेपण सोनाली केबल व्हीजन प्रा.लि. ब चॅनलद्वारेसौजन्य सुवर्णा जी गोपाळ आमोणकर परिवार मुंबई.फुलांची संपूर्ण सजावट श्री. अजित आंगणे, श्री. अॅड. सुरज कुडाळकर शेखर, श्री. चव्हाण ह.श्री. रेश्वर गोसावी, किशोर नेवरेकर, श्री. संतोष बेर्डे, श्री. सुधीर परब, श्री. व सहकारी यांच्या सौजन्याने.छायाचित्रण व द्रुकश्राव्य चित्रण सौजन्य: श्री. राजेश मुणगेकर व सहकारी.













