महामार्गावरील वेताळ बांबर्डे तिठा नजीकची घटना
कुडाळ: प्रतिनिधी
महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरच्या वीजवाहिनीचा (केबल) विद्युत प्रवाह गाभण गाईस लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वेताळ बांबर्डे तिठा-देवमळा (शेतमळा) येथे संध्याकाळी ६.३० च्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, पावशी सीमावाडी येथे राहणाऱ्या रिझवान उस्मान शेख यांची ७ वर्षांची गाभण गाईस देवमळा येथील शेतात चरत असता तिला ट्रान्सफॉर्मरच्या वीजवाहिनीचा विद्युत प्रवाह (शॉक) लागून तिचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये शेतकरी रिझवान उस्मान शेख यांचे अंदाजे ४५ ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर महावितरणच्या निष्काळजीपणा कारभारावर स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. गाभण गाईचा असा मृत्यू झाल्याने शेतकरी रिझवान यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
1
/
104
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
1
/
104


Subscribe










